Select Language






Articles (तंत्रज्ञान मराठीतून)



संगणकावर मराठीत कसे लिहावे ?

= “संगणकावर मराठीत कसे लिहावे?” - नेहमी विचारला जाणारा प्रश्न. Frequently asked question (FAQ).

अनेक तज्ञांची अनेक मते. विविध माध्यमांचे विविध मार्गदर्शन. असो. आपण मूळ मुद्द्यावर येऊ.

आपण आता काही खालील प्रश्नांची प्रात्यक्षिक पद्धतीने उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करू. जसे;

·         संगणकावर मराठीत कसे लिहावे?

·         त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर आहे?

·         ते कुठे मिळेल?

·         त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील काय?

·         ते कसे इन्स्टॉल करायचे?

·         आणि ते कसे वापरायचे?

प्रश्न क्रमांक १. संगणकावर मराठीत कसे लिहावे?

= संगणकावर मराठी लिहिणे अतिशय सोपे आहे आणि त्यासाठी कुठलेही प्रशिक्षण घेणें गरजेचे नाही. अगदी संगणकाचे जुजबी ज्ञान असेल तरी देखील आपण मराठीत संगणकावर लिहू शकतो हे विशेष.

प्रश्न क्रमांक २. त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर आहे ?

= अनेक सॉफ्टवेअर बाजारात आहेत. गुगल इनपुट मेथोड Google Input Method, मायक्रोसॉफ्ट ग्लोबल इनपुट मेथोड Microsoft Global Input Method, क्विलपॅड Quillpad, गमभन Gamabhana, लिपिकार Lipikar, बराह Baraha, श्री-लिपी Shree-Lipi, आयएसएम ISM, आकृती Akruti, फोन्टफ्रीडोम FontFreedom, अक्षरमाला Aksharmala, किरण फोन्ट Kiranfont, आयराईट IWrite असे अनेक आहेत. काही महत्वाची राहिलीही असतील परंतु तुम्ही जर Marathi Typing  असे इंटरनेट वर सर्च केले तर अनेक पर्याय उपलब्ध होतील. सगळ्यांची नावे व कृति इथेच सांगून गोंधळ नको म्हणून आपण एक एक करून बघू.

प्रश्न क्रमांक ३. ते कुठे मिळेल ?

= ही सॉफ्टवेअर दोन प्रकारात मोडते. १. ऑनलाईन मराठी लिहिण्याची सेवा आणि २. ऑफलाईन मराठी लिहिण्याची संगणक प्रणाली. ऑनलाईन सेवा ही तत्काळ व तुलनेने वापरण्यास अधिक सोपी आहे. परंतु त्यासाठी इंटरनेट सतत सुरु ठेवणे गरजेचे आहे. ऑफलाईन प्रकारात ही सर्व सॉफ्टवेअर त्या त्या वेबसाईट वरून डाउनलोड करून घेता येतात. नंतर इंटरनेट सुरु नसले तरी चालते. काहींच्या सीडीज् देखील बाजारात उपलब्ध आहेत.

प्रश्न क्रमांक ४. त्यासाठी काही पैसे द्यावे लागतात काय?

= ह्यातील बरीचशी सॉफ्टवेअर ही मोफत आहेत तर काही विकत मिळतात.

प्रश्न क्रमांक ५. ते कसे इन्स्टॉल करायचे ?

= संगणकावर मराठी लिहिण्याच्या पहिल्या ऑनलाईन प्रकारात कुठलेही सॉफ्टवेअर डाउनलोड अथवा इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच म्हणालो की ऑनलाईन मराठी लिहिणे हा प्रकार खूप सोप्पा आणि सर्वांना सहज जमण्यासारखा आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण हा मराठी लिहिण्याचा ऑनलाईन चा पर्याय जाणून घेऊ. त्यासाठी तुमच्याकडे हवे केवळ इंटरनेट कनेक्शन.

·         इंटरनेट सुरु करा.

·         http://www.google.com/transliterate/Marathi ही वेबसाईट उघडा. खालील प्रमाणे चित्र दिसेल.

googleonline.png
संपूर्ण माहितीसाठी खालील विडीओ बघा.

·         मराठीत फोनेटिक पद्धतीने म्हणजेच उच्चाराप्रमाणे लिहायला सुरु करा. जसे ata=आता marathit =मराठीत liha= लिहा. इथे मराठीत लिहिलेले तुम्ही हवे तिथे कॉपी-पेस्ट Copy & Paste करू शकता.

·         अशीच आणखी एक चांगली वेबसाईट बघू जी लिहिताना मराठी शब्द देखील सुचवते.

·         http://www.quillpad.in/editor.html ही वेबसाईट उघडा. खालील प्रमाणे चित्र दिसेल.

quillpad.png
संपूर्ण माहितीसाठी खालील विडीओ बघा.

·         मराठी भाषा निवडा आणि उच्चाराप्रमाणे लिहायला सुरु करा. जसे नमस्कार लिहिण्यासाठी ‘namaskar’ आणि भारत लिहिण्यासाठी ‘bharat’  

·         http://www.marathityping.com/  तसेच http://www.gamabhana.com/gamabhana_pro/  या आणखी काही वेबसाईटस् की ज्या ऑनलाईन मराठी लिहिण्यासाठी आपल्याला मदत करतात.  तुम्हाला जी सोयीची वाटेल ती वापरा. शेवटी आपल्याला काय, मराठीत लिहिता येणे महत्वाचे!

आत्तापर्यंत आपण बघितले ऑनलाईन मराठी लिहिण्याबद्दल. परंतु सतत काही इंटरनेट सुरु ठेवणे शक्य नसते. बऱ्याचदा आपण ऑफलाईन काम करणे पसंत करतो. आणि म्हणून ऑनलाईन सारखीच सुविधा इंटरनेटशिवाय मिळू शकली तर अधिक बरे होईल असें वाटणे स्वाभाविक आहे. त्यात निराशा होण्याचेही काही कारण नाही.

तर मग आता आपण ऑफलाईन सॉफ्टवेअर बद्दल बोलू यात. हे ऑफलाईन असल्यामुळे आणि त्यातूनही ते सॉफ्टवेअर असल्यामुळे डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागते हे आधी लक्षात घेतले पाहिजे.

वेळ आणि जागेअभावी आपण फक्त मोफत मिळणाऱ्या काही सॉफ्टवेअर बद्दल शिकू यात. त्यातही विंडोज Windows ही ऑपरेटिंग सिस्टम Operating System (OS)  तथा संगणकप्रणाली सर्वपरिचित व अधिक वापरात असल्याने आपण यां लेखात केवळ विंडोज बद्दलच बोलू. इतर OS बद्दल नंतर कधीतरी.

ओके, चला तर मग ...

सर्वप्रथम तुमच्याकडे हव्यात ३ गोष्टी;

1.       संगणक

2.       विंडोज इन्स्टॉलेशन सीडी

3.       इंटरनेट सुविधा.

बस्स!

आता खालील प्रमाणे कृति करा.

1.       सर्वप्रथम संगणकावरील सर्व प्रोग्राम बंद करा.

2.       आता इंटरनेट सुरु करा.

3.       http://www.google.com/ime/transliteration/ वेबसाईट ओपन करा.

खालील प्रमाणे चित्र दिसेल

step 3.png

4.       मराठी भाषा निवडा व डाउनलोड बटन ला क्लिक करा खालील स्क्रीन दिसेल.

step 4.png

5.       Run बटनला क्लिक करा. डाऊनलोडिंग सुरु होईल. पुढे काही प्रश्न विचारल्यास सकारात्मक उत्तरे द्या जसे Yes, Accept, Allow, OK. Continue इत्यादी.

step 5.png

6.       I Accept ला टिक करून Next बटनला क्लिक करा.

7.       झाले इन्स्टॉलेशन पूर्ण.

आता पुढे काय? – तर ते सेट करायचे. त्यासाठी;

step 6.png

8.       My Computer माय कम्प्युटर मध्ये जाऊन Control Panel कंट्रोल पॅनल ओपन करा.

step 6.png

9.       Control Panel मधील Regional and Language सेटिंग उघडा.

step 8.png

10.   Language टॅब निवडाInstall Files for Complex Script & .. ला टिकमार्क केलेले नसल्यास टिकमार्क करून  Apply करा ( वरील सर्व स्क्रीन विंडोज एक्सपी Windows XP च्या आहेत. Windows Vista, Windows 7 यांच्या स्क्रीन देखील थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. तरी देखील इंग्रजी समजणाऱ्यांसाठी अधिक मदत http://www.google.com/ime/transliteration/help.html या संकेतस्थळावर दिलेली आहेच.)

11.   यां प्रोसेस दरम्यान तुम्हाला विंडोज ची सीडी विचारण्याची शक्यता आहे. त्यावेळी विंडोज ची इनस्टॉलर सीडी सीडी-रॉम मध्ये टाका व पुढील सूचनांचे पालन करा.

12.   ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खालील चित्रात दर्शविल्याप्रमाणे डिटेल्स ‘Details’  बटन दाबा.

step 12.png

13.   Details मध्ये गेल्यावर तुम्हाला Google Marathi Input दिसेल. त्याला क्लिक करा आणि Key Settings बटन चित्रात दाखविल्याप्रमाणे क्लिक करा.

step 13.bmp

14.   आता आपल्या संगणकात इंग्लिश व मराठी अशा दोन भाषा असल्यामुळे आपल्याला त्या दोन्हीमध्ये हवी ती वापरता येणे आवश्यक आहे. म्हणून Switch between input languages चा पर्याय निवडून खालील चित्राप्रमाणे Change Key sequence ला क्लिक करा.

step 14.png

15.   खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल. त्यात Switch input language  आणि Switch keyboard layout हे दोन्ही पर्याय निवडा आणि सगळी OK ची बटणे दाबत दाबत बाहेर पडा.

step 15.png

16.   झाले. तुमचे कम्प्युटर आता मराठी लिहिण्यासाठी तयार.

17.   परंतु मराठी लिहिण्यासाठी एकदा कम्प्युटर रिस्टार्ट Restart म्हणजे बंद करून चालू करणे गरजेचे आहे.

आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न क्रमांक ६. ते वापरायचे कसे ?

18.   संगणकावरील कोणताही एडिटर प्रोग्राम सुरु करा जसे वर्ड Word, नोटपॅड Notepad, एक्सेल Excel, इमेल email ई.

19.   किबोर्डवर अल्ट+शिफ्ट Alt + Shift  ही दोन्ही बटन्स दाबा, खालील आयकॉन दिसेल. याचा अर्थ मराठी सुरु झाले.

step 10.png

20.   पुन्हा अल्ट + शिफ्ट Alt + Shift  दाबल्यास इंग्रजी लिहिता येईल.   

21.   Lang.png सोबतच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे Task Bar वरील Language Bar बटनांचा उपयोग करून भाषा बदलवता येते. अशा पद्धतीने इंग्रजीत व मराठीत हवे तसे लिहिता येते.

मराठी टाईपिंग हे फोनेटिक Phonetic  म्हणजे उच्चाराप्रमाणे असल्यामुळे लिहिणे खूप सोपे आहे जसे; ‘पाणी’ लिहायचे झाल्यास pani  असें लिहा, ‘भारत’=bharat, ‘घर’=ghar, ‘आशीर्वाद’=ashirvad ई. आहे की नाशी सोपे! आणि विशेष म्हणजे युनिकोड मध्ये आहे. काही शब्द सुरुवातीला येत नसतील तर स्क्रीनवरील किबोर्ड आहेच मदतीला. मी देखील हा संपूर्ण वार्तालाप ह्याच सॉफ्टवेअर च्या मदतीने लिहिला आहे.

वरील सर्व कृति ही जरा वेळखाऊ वाटत असली तरी ती एकदाच करावी लागते. अर्थात तुम्ही एखाद्या संगणक जानकारालाही कामाला लाऊ शकता परंतु स्वत: केल्याचे समाधान काही औरच. नाही का? म्हणूनच मी जरा सविस्तर वर्ग घेतला. आणि हे समाधान मिळणे अधिक सोयीचे व्हावे म्हणून मित्रांच्या सल्ल्यानुसार मी याचे व्हीडीवो प्रात्यक्षिक video demonstration ही तयार केले आहे.



Windows XP साठी खालील विडीओ बघा.



Windows Vista किंवा Windows 7 साठी खालील विडीओ बघा.

इतरानाही सांगा आणि आपली मराठी संगणकावर झळकू द्या.

eBook : संगणकावर मराठीत कसे लिहावे?


... क्रमशः

KHANDBAHALE.COM KHANDBAHALE.COM
खांडबहाले.कॉम since 1998
Register | About | Contact | Sitemap